तीन राज्यातील सत्ता टिकविण्यासाठी उमेदवारी देतांना भाजप राजकीय समीकरण वापरणार

0

नवी दिल्ली- २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पुढील महिन्यात पाच राज्यात राज्यात होत असलेल्या विधान सभेच्या निवडणुका भाजपसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. दरम्यान या राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश तीन राज्यातील निवडणुका जिंकण्यासाठी भाजप रणनीती आखत आहे. पाच राज्यांमध्ये जागा वाटपाबाबत भाजपची 20 ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत विशेषत: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये तिकीट वाटपाबाबत अधिक चर्चा होणार आहे. कारण या राज्यात भाजप सत्तेत आहे. सत्ता टिकविणे भाजपसाठी महत्वाचे आहे.

दरम्यान या राज्यात तिकीट देतांना मोठ्या प्रमाणात जातीय समीकरणाचा विचार केला जाणार आहे असे बोलले जात आहे.