सत्तेसाठी भाजप पैशांचा वापर करेल-राहुल गांधी

0

बंगळूर-सुप्रीम कोर्टाने उद्या भाजपला कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहे. आता भाजप याठिकाणी सत्तास्थापनेसाठी पैसा व बळाचा वापर करेल अशी अशी भीती राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

संविधानाचा विजय

कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी दिले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे काँग्रेसने स्वागत केले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला म्हणाले, अखेर संविधानाचा विजय झाला असून लोकशाही वाचली. येडियुरप्पा आता एक दिवसाचेच मुख्यमंत्री ठरतील. कर्नाटकच्या राज्यपालांचा संविधानविरोधी निर्णय हायकोर्टाने फेटाळला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरुन राज्यपाल वाला यांचा निर्णय अयोग्य असल्याचे स्पष्ट होते. बहुमत नसतानाही सत्तास्थापन करण्याचा भाजपाचा डाव न्यायालयाने हाणून पाडला. आम्ही भाजपाला कायद्याच्या चौकटीत राहुनच थांबवले. पण आता ते सत्तेसाठी पैसा व बळाचा वापर करणार, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.