भाजप पैशाच्या जोरावर सरकार पडण्याचा प्रयत्नात: राहुल गांधी

0

बंगळूर: कर्नाटक सरकारमधील काही आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे सरकार अल्पमतात आले आहे. विश्वासदर्शक ठराव मांडला गेल्यास सरकारसमोर बहुमत सादर करणे मोठ्या मुश्कीलीचे ठरू शकते. दरम्यान कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील राजकीय घडामोडीला भाजपला जबाबदार धरत टीका केली आहे. पैशाच्या जोरावर भाजप कर्नाटक सरकार अस्थिर करण्याच्या इराद्यात आहे असे आरोप त्यांनी केले आहे.

आजच सुप्रीम कोर्टात कर्नाटक प्रश्नी सुनावणी झाली असता, सुप्रीम कोर्टाने मंगळवारी पुन्हा सुनावणी करण्याचा निर्णय दिला आहे. तोपर्यंत विधानसभा अध्यक्षांनी आमदारांचे राजीनामे स्वीकारू नये किंवा त्यांना अपात्र करू नये असे आदेश दिले आहे.