भाजपसाठी मत मागून खूप मोठी चूक केली

0

धुळे : शेतीचे प्रश्न आणि भाजप सरकारची धोरणे या मुद्द्यांवर मतभेद झाल्याने खासदार राजू शेट्टी यांनी सरकारपासून फारकत घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपसाठी महाराष्ट्रभर मत मागितले मात्र भाजपसाठी मत मागून मी खूप मोठी चूक केल्याची खंत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. सरकारी अनास्थेचे बळी ठरलेले धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांच्या विखरण या गावी शेतकरी सन्मान यात्रेस प्रारंभ झाला. या वेळी शेट्टी बोलत होते.

भाजप सरकार आणून भाकरी करपू नये म्हणून परतवली मात्र या सरकारने तवाच करपून लावल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली. यावेळी त्यांनी धर्मा पाटील प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, यावेळी बोलताना शेट्टी यांनी शेतकऱ्याच्या जमीनी हडपणाऱ्यांवरही आरोप करीत धर्मा पाटील प्रकरणात सदोष भनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.