आम्हाला सेनेसोबत युती हवी आहे-गडकरी

0

नवी दिल्ली-सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये बेबनाव सुरु आहे. शिवसेनेबरोबर कुरबुरी कायमचीच आहे असे असले तरी आम्हाला शिवसेनेसोबत युती हवी आहे. शिवसेनेबरोबर आमचे दृढ संबंध आहेत असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अनेकवेळा जाहीरपणे शिवसेनेबरोबर आघाडी करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. पण शिवसेनेकडून युती संबंधी अद्याप कुठलेही सकारात्मक वक्तव्य आलेले नाही.

हिंदुत्व हा आमच्या दोन्ही पक्षांमधील युतीचा आधार आहे. भाजपा आणि शिवसेनेमध्ये कोणतेही वैचारीक मतभेद नाहीत असा दावा गडकरींनी केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा करुन तिथे पूजा-अर्चा केली त्या प्रश्नावर गडकरी म्हणाले की, आम्हाला शिवसेनेसोबत आघाडी हवी आहे. त्यांना सत्ताधाऱ्याची भूमिका बजावायची की, विरोधकाची ते त्यांच्यावर आहे असे उत्तर त्यांनी दिले.