उत्तरप्रदेश मध्ये भाजपला १०-१५ जागा मिळतील: ओम प्रकाश राजभर

0

बलिया: आगामी लोकसभा निवडणुकीत देशात भाजपाचा पराभव होणार आहे. उत्तरप्रदेश मध्ये भाजपाला १० ते १५ जागा मिळतील, तर सपा, बसपा ला ५५ ते 60 जागा मिळतील. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीवेळी महत्वाची भूमिका बजावणारे सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष आणि उत्तरप्रदेश मधील मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी केला आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही. तसेच पूर्वांचल मध्ये सपा- बसपा आघाडीला चांगले यश मिळणार आहे. भाजपला आमची साथ न मिळाल्याने कमीत कमी ३० जागांवर परिणाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सपा- बसपाची वाढती ताकत भाजपसाठी चिंतेचा विषय आहे असेही ते म्हणाले.