भाजप ‘या’ तारखेपासून राबवणार महा-जनसंपर्क अभियान..

मुंबई : मोदी सरकारला आज (२९ मे) नऊ वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने ३० मे ते ३० जून २०२३ या दरम्यान महा-जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानासंदर्भात आज राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये बैठका आणि पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

२०१४ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार पहिल्यांदा केंद्रात सत्तेवर आले आणि त्यानंतर २०१९ मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. असे दोन्ही वेळेस मिळून आज मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने या महा जनसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

देशभरात राबविल्या जाणाऱ्या या अभियानामध्ये राज्यातील सरकारच्या तसेच केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश ठेवला आहे.