भाजप ३०० पेक्षा अधिक जागा जिंकणार; अमित शहांचा दावा

0

नवी दिल्ली: १७ व्या लोकसभेसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान शिल्लक आहे. १९ रोजी त्यासाठी मतदान होत आहे. संपूर्ण देशातील राजकारण तापले आहे. दरम्यान काल कोलकात्यात भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचा रोड शो झाला. त्यावेळी हिंसाचार झाला. वाहनांची जाळपोळ करण्यात आली, पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. याबाबत आज अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेत तृणमूल कॉंग्रेसवर निशाणा साधला.

देशातील ६ टप्प्यातील मतदान झाले असून भाजपला पूर्ण बहुमत मिळणार आहे. भाजपा ३०० पेक्षा अधिक जागा जिंकणार असून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएची सरकार येणार असल्याचा दावा अमित शहा यांनी केला. ६ टप्प्यात झालेल्या मतदानातच भाजपला बहुमत मिळाले असून आता फक्त निकालाची औपचारिकता बाकी असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.

देशभरात मतदान झाले. मात्र हिंसाचार कोठेही झाला नाही. पश्चिम बंगालमध्येच हिंसाचार होत असून आला तृणमूल कॉंग्रेसच जबाबदार असल्याचे आरोप अमित शहा यांनी केला आहे.