भाजपचे येडियुरप्पा अखेर मुख्यमंत्री बनले

0

बंगळूर-सर्वोच्च न्यायालयाने शपथविधी रोखण्यास नकार दिल्यानंतर भाजप नेते येडियुरप्पा यांनी अखेर आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यानंतरच इतर मंत्र्यांचा शपथविधी होईल. राजभवनात आज सकाळी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यानंतरच इतर मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. त्यांना आता येत्या १५ दिवसांत बहुमत सिद्ध करायचे आहे. दरम्यान, शपथविधीला जाण्यापूर्वी येडियुरप्पा यांनी सकाळी विविध मंदिरांमध्ये जाऊन देव दर्शन घेतले.