लोकांचे हातपाय बांधून आणा आणि भाजपला मत टाकून घ्या

0

बंगळूर- कर्नाटक निवडणुकीत भाजपा कॉंग्रेस एकमेकासमोर उभे ठाकले आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. यातच भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येदियुरप्पा नवीन वादात सापडले आहे. त्यांनी लोकांचे हातपाय बांधून आणा आणि भाजपच्या उमेदवाराला मत टाकून घ्या असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे ते टीकेचे धनी बनले आहे. कॉंग्रेसने त्यांच्यावर निशाना साधला असून ही कोणती लोकशाही आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे. भाजप लोकशाहीचा अपमान करत आहे असे आरोप कॉंग्रेसने केले आहे.