चोपडा प्रतिनिधी l
चोपडा शहर भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून धरणगाव मार्गे जळगाव रात्री ८.३० व १०.३० वाजेची चोपडा ते धरणगाव मार्गे जळगाव पुर्ववत बस सुरू करण्याची मागणी चोपड्याचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांना निवेदन देऊन सविस्तर पणे शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल व पदाधिकारी यांनी केली आहे तसेच आगार प्रमुख यांच्या लक्षात आणून दिले की चोपडा कडून जळगाव कडे जाणार्या व जळगाव कडून चोपडा कडे येणाऱ्या तालुक्यातील प्रवाशांच्या मोठ्या प्रमाणात हाल होतात व रात्र रात्र भर बस स्टाॅप वर मुक्काम करावा लागतो त्या त्रास पासुन प्रवाशांची सुटका व्हावी म्हणून लवकरात लवकर बस पुर्णवत सुरू करावी अशी विनंती केली असता आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी या निवेदनास होकार देऊन येणाऱ्या दोन तीन दिवसात बस सुरू करण्याची ग्वाही दिले त्यांनी ग्वाही देताच चोपडा शहर भारतीय जनता पार्टी च्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले यावेळेस उपस्थित शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल
व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मराठे युवा मोर्चा जिल्हा सदस्य तुषार पाठक सरचिटणीस मनोहर बडगुजर जैन प्रकोष्ट तालुकाध्यक्ष संजय जैन शहर उपाध्यक्ष गोपाल पाटील
युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष संदिप चव्हाण अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्ष प्रेम घोगरे युवा मोर्चा सरचिटणीस आकाश नेवे
सोशल मिडीया अॅप प्रमुख धर्मदास पाटील एमआयडीसीचे चेअरमन देविदास (पप्पू) सोनार आदी उपस्थित होते