जळगाव (जनशक्ति चमूकडून) । भारतीय जनता पक्षाने लोकसभा, विधानसभा व नगरपालिकांमधील दणदणीत विजयाची मालिका कायम राखत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही यश संपादन केले आहे. जिल्हा परिषदेत भाजपला सर्वाधीक 33 जागा मिळाल्या असून स्पष्ट बहुमतासाठी या पक्षाला अवघ्या एका जागेची आवश्यकता भासणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 16, शिवसेनेला 14 तर काँग्रेसला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. जिल्हा परिषदेत गेल्या दोन दशकांपासून भाजप व शिवसेनेची युती सत्तेत असतांना आता भाजपला जवळपास स्पष्ट बहुमत मिळाल्याने युती होणार का? याबाबत प्रचंड उत्सुकता लागून आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश पंचायत समित्यांवरही भाजपचाच झेंडा फडकणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. भाजपला रावेर लोकसभा मतदारसंघात लक्षणीय यश लाभले आहे. चोपडा, यावल, रावेर, जामनेर, बोदवड आणि मुक्ताईनगरमध्ये भाजपला यश मिळाले असले तरी भुसावळ तालुक्यात मात्र अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
तालुकानिहाय जागा
जिल्ह्यातील जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकासाठी बुधवार 16 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात आले होते. आज तालुका पातळीवर सकाळी 10 वाजेच्या सुमारास मतमोजणीला सुरूवात करण्यात आली. साधारण दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास मतमोजणी संपून निकाल जाहिर करण्यात आला. यात जळगाव तालुक्यातील 5 गटांमध्ये भाजपा 2, राष्ट्रवादी 2 तर शिवसेना 1; चोपडा तालुक्यातील 6 गटांमध्ये भाजपा 3, राष्ट्रवादी व शिवसेना प्रत्येकी 1; यावलमध्ये 5 गटांपैकी भाजपा 3 तर काँग्रेसला 2 जागा मिळाल्या. रावेरमध्ये 6 गटातून भाजपा 4, राष्ट्रवादी आणि काँग्रेस 1, मुक्ताईनगर तालुक्यातील 4 गटासाठीच्या चार तर बोदवड दोन गटासाठीच्या दोन्ही जागांवर भाजपाने बाजी मारली. भुसावळच्या तीन गटांपैकी भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना प्रत्येकी एक जागा मिळाल्या आहे. जळगाव तालुक्यात 5 गटांमधून भाजपा 2, राष्ट्रवादी 2 आणि शिवसेना 1 अशा जागा काबिज केल्या. धरणगावच्या तीन गटातून भाजपा एक आणि शिवसेना 2; अमळनेरच्या 4 गटातून भाजपा व राष्ट्रवादी प्रत्येकी दोन जागा मिळविल्या आहेत. पारोळा तालुक्याच्या 4 गटासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळवला आहे. एरंडोलच्या तीन गटातून भाजपा 1 आणि शिवसेना 2, जामनेर तालुक्यातील 7 गटातून भाजपाला 5 जागा तर राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या आहे. पाचोर्यातून भाजपा 2 तर शिवसेना 3 जागा तर भडगावमध्ये राष्ट्रवादी 1 आणि शिवसेना 2 अश्या जागांवर समाधान मानावे लागले. आणि चाळीसगाव तालुक्यातील 7 गटांपैकी भाजपाला 3 राष्ट्रवादीला 4 याप्रमाणे जागा मिळविल्या आहे. जिल्हा परीषदेच्या गटासाठी भाजपाला 67 जागांपैकी 33 जागांवर विजय मिळाला आहे. मात्र भाजपला पारोळा आणि भडगाव येथे खाते उघडता आले नाही तर शिवसेनेला चोपडा, भुसावळ, जळगाव तालुक्यात प्रत्येकी 1, धरणगाव, पारोळा, एरंडोल आणि भडगाव तालुक्यात 2 तर पाचोरा 3 असे एकुण 14 जागांवर विजय मिळविला आहे. दुसरीकडे काँग्रेसने चोपडा, यावल आणि रावेर मिळून 4 जि.प. गटात जागा मिळविल्या आहे.
मातेचा पराभव अन् काका-पुतणे विजयी !
जळगाव तालुक्यातील म्हसावद-बोरनार गटातून माजी जि.प. अध्यक्ष कै. भिलाभाऊ सोनवणे यांच्या पत्नी लिलाबाई सोनवणे यांच्यासमोर खुद्द त्यांचे पुत्र पवन सोनवणे उभे ठाकल्याने ही लढत लक्षणीय बनली होती. यात आई भाजप तर मुलगा शिवसेनेकडून मैदानात होते. विशेष म्हणजे भिलाभाऊंचे बंधू प्रभाकरआप्पा सोनवणे हेदेखील भाजपच्या तिकिटावर कानळदा-भोकर गटातून निवडणुकीच्या रिंगणात होते. सोनवणे कुटुंबातील राजकीय वारशाबाबत सुरू असणारा संघर्ष हा जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला होता. मात्र अखेर या लढतीत पवन सोनवणे यांनी आपल्या मातोश्रींचा प्रचंड मताधिक्याने पराभव केला. तर दुसरीकडे प्रभाकरआप्पा सोनवणे यांनी मात्र शिवसेनेच्या लकी टेलर यांना पराभूत केले. या माध्यमातून आता सोनवणे काका-पुतण्याने एकदचा जिल्हा परिषदेत प्रवेश केला आहे. दरम्यान, आज निकाल जाहीर झाल्यानंतर पवन सोनवणे यांनी प्रभाकरआप्पा समोर दिसताच पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले तेव्हा उपस्थितांनी एकच जयघोष केला.
…तर प्रतापराव पाटील उपाध्यक्ष ?
सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांचे पुत्र प्रतापराव पाटील यांना पाळधी-बांभोरी गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतारले होते. त्यांच्या समोर राष्ट्रवादीचे रमेश पाटील होते. या निवडणुकीच्या प्रचारातील वादामुळे हा गट चर्चेच्या झोतात आला होता. आपल्या मुलाच्या विजयासाठी ना. पाटील यांनी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली होती. याला फळ मिळत प्रतापराव पाटील यांचा विजय झाला आहे. जिल्हा परिषदेत भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यास प्रतापराव पाटील यांना उपाध्यक्षपद मिळणार का? याबाबत आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे.
तालुकानिहाय जागा
जिल्ह्यातील जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकासाठी बुधवार 16 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात आले होते. आज तालुका पातळीवर सकाळी 10 वाजेच्या सुमारास मतमोजणीला सुरूवात करण्यात आली. साधारण दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास मतमोजणी संपून निकाल जाहिर करण्यात आला. यात जळगाव तालुक्यातील 5 गटांमध्ये भाजपा 2, राष्ट्रवादी 2 तर शिवसेना 1; चोपडा तालुक्यातील 6 गटांमध्ये भाजपा 3, राष्ट्रवादी व शिवसेना प्रत्येकी 1; यावलमध्ये 5 गटांपैकी भाजपा 3 तर काँग्रेसला 2 जागा मिळाल्या. रावेरमध्ये 6 गटातून भाजपा 4, राष्ट्रवादी आणि काँग्रेस 1, मुक्ताईनगर तालुक्यातील 4 गटासाठीच्या चार तर बोदवड दोन गटासाठीच्या दोन्ही जागांवर भाजपाने बाजी मारली. भुसावळच्या तीन गटांपैकी भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना प्रत्येकी एक जागा मिळाल्या आहे. जळगाव तालुक्यात 5 गटांमधून भाजपा 2, राष्ट्रवादी 2 आणि शिवसेना 1 अशा जागा काबिज केल्या.
धरणगावच्या तीन गटातून भाजपा एक आणि शिवसेना 2; अमळनेरच्या 4 गटातून भाजपा व राष्ट्रवादी प्रत्येकी दोन जागा मिळविल्या आहेत. पारोळा तालुक्याच्या 4 गटासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळवला आहे. एरंडोलच्या तीन गटातून भाजपा 1 आणि शिवसेना 2, जामनेर तालुक्यातील 7 गटातून भाजपाला 5 जागा तर राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या आहे. पाचोर्यातून भाजपा 2 तर शिवसेना 3 जागा तर भडगावमध्ये राष्ट्रवादी 1 आणि शिवसेना 2 अश्या जागांवर समाधान मानावे लागले. आणि चाळीसगाव तालुक्यातील 7 गटांपैकी भाजपाला 3 राष्ट्रवादीला 4 याप्रमाणे जागा मिळविल्या आहे. जिल्हा परीषदेच्या गटासाठी भाजपाला 67 जागांपैकी 33 जागांवर विजय मिळाला आहे. मात्र भाजपला पारोळा आणि भडगाव येथे खाते उघडता आले नाही तर शिवसेनेला चोपडा, भुसावळ, जळगाव तालुक्यात प्रत्येकी 1, धरणगाव, पारोळा, एरंडोल आणि भडगाव तालुक्यात 2 तर पाचोरा 3 असे एकुण 14 जागांवर विजय मिळविलाआहे. दुसरीकडे काँग्रेसने चोपडा, यावल आणि रावेर मिळून 4 जि.प. गटात जागा मिळविल्या आहे.
अध्यक्षपद कुणाला ?
भाजपला मिळालेल्या यशात रावेर लोकसभा मतदारसंघातील 22 जिल्हा परिषदेच्या जागांचा मोलाचा वाटा आहे. यात जामनेर तालुक्यातील पाच तर मुक्ताईनगर व बोदवडच्या सहा जागांचा समावेश आहे. हे दोन्ही मतदारसंघ अनुक्रमे ना. गिरीश महाजन व आ. एकनाथराव खडसे यांचे आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. या पार्श्वभूमिवर अध्यक्षपदाची संधीदेखील याच दोन मतदारसंघाला मिळू शकते. जामनेर तालुक्याला लागोपाठ दोनदा अध्यक्षपद मिळाले होते. आता यात बदल होणार का? याबाबत उत्सुकता लागली आहे.
एका जागेचे त्रांगडे
भाजपला स्पष्ट बहुमतासाठी फक्त एका जागेची आवश्यकता आहे. शिवसेना सोबत आल्यास बहुमतासाठी कोणतीही गरज उरणार नाही. मात्र शिवसेनेला उपाध्यक्षपदासह सत्तेचा अन्य वाटा देण्याऐवजी काँग्रेसला सोबत घेत त्यांना एकच सभापतीपद देण्यावरही विचार होऊ शकतो. अर्थात राज्य पातळीवरून युती जवळपास अपरिहार्य असल्याने जळगावातही शिवसेनेला सोबत घ्यावेच लागणार आहे. मात्र वरिष्ठ पातळीवरून बोलणी फिसकटली तर यात अडचण होऊ शकतो. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस मिळून 34 ही ‘मॅजिक फिगर’ गाठता येणार असली तरी ही शक्यता सध्या तरी अशक्य कोटीतली वाटत आहे.
Web Title: BJP’s Grand Victory in ZP and Panchayat Samiti in Jalgaon District