भाजपचे येडियुरप्पा मुख्यमंत्री होणार

0

बंगळुरु : कर्नाटकात हालचालींना वेग आला आहे. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचा दावा केला आहे. जेडीएसला गळाला लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी जेडीएसच्या कुमारस्वामींची भेट घेतल्याची देखील चर्चा आहे. भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी येडियुरप्पा यांची नियुक्ती झाली असून ते राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.

भाजपने जेडीएसचे ४ आणि काँग्रेसचे आणखी काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे आमदार फुटू नये म्हणून काँग्रेस जोरदार प्रयत्न करत आहे. एक अपक्ष आमदार देखील भाजपसोबत असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. त्यामुळे १०४ जागा मिळालेला भाजप ११३ हा बहुमताचा आकडा कसा गाठतो याबाबत सगळ्यांनाच उत्सूकता लागली आहे.