रावेर प्रतिनिधी l
– रावेर शहरात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी बुधवारी दुपारी दोन धान्य गोदाम सिल केल्या नंतर बालाजी ट्रेड्सला महसूल विभागा तर्फे नोटीस दिली जाणार असल्याचे तहसिलदार बंडू कापसे यांनी सांगितले. तसेच तालुक्यात रेशनच्या धान्याचा काळाबाजार होत असल्याची ओरड असुन याचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी भारतीय जनता पक्षा तर्फे करण्यात आली आहे.
मध्य प्रदेश राज्य शेजारी असल्याने रावेर परिसरातुन मोठ्या प्रमाणात रेशनच्या धान्याचा काळाबाजार होत असल्याची ओरड आहे.त्यातच जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केलेल्या धडक कारवाईमुळे एकच खलबळ उडाली आहे.आज महसूल विभागातर्फे बालाजी ट्रेड्सला नोटीस बजावण्याचे हालचाल सुरु होती.जिल्हाधिकारी यांनी केलेल्या कारवाईत बालाजी ट्रेड्सच्या गोदामामध्ये २०८ तांदळाचे कट्टे ९७ कट्टे गहु तर ११ ज्वारी कट्टे आढळले तर शेख नयूब शेख़ आयूम यांच्याकडे सुध्दा १२ क्विंटल धान्य आढळले हे धान्य रेशनचा असल्याचा महसूल प्रशासनाला संशय आहे.तर इकडे भाजपा तर्फे या रेशन प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर यांनी केली आहे.