राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती निमीत्त जामनेरात रक्तदान शिबीर संपन्न, 157 रक्तदात्यांनी केले रक्तदान
जामनेर प्रतिनिधि l
राजमाता अहिल्या माता होळकर यांच्या जयंतीनिमित्त दोस्ती यारी ग्रुप फाउंडेशन तर्फे चिंतामणी हनुमान मंदिर जामनेर पुरा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी अहिल्यामाता होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन संजय दादा गरुड ,अनिल बोहरा,माधव चव्हाण ,डॉ. प्रशांत पाटील डॉ. नंदलाल पाटील ,संतोष झाल्टे ,विलास राजपूत, सचिन बोरसे, राहुल सोनवणे, डी डी पाटील सर बाबुराव हिवराडे, प्रकाश पाटील नाना बाविस्कर पप्पू पाटील यांच्या हातून प्रतिमेचे पूजन केले रक्तदान शिबिरास सकाळी नऊ वाजेपासून उत्साहात सुरू झाले यामध्ये युवकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर होता आणि 157 रक्तदात्यांनी रक्तदान करून अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली त्याप्रसंगी सर्व रक्तदात्यांना अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा सप्रेम भेट देण्यात आली यासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटी जळगाव यांच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले यासाठी दोस्ती यारी ग्रुपचे उल्हास नेमाडे ,संदीप साबळे ,प्रदीप कल्याणकर ,दीपक खाटीक ,आकाश कल्याणकर मनोज बोरसे ,भूषण बुंदेले ,विकास सोनवणे, योगेश चौधरी, निखिल राजपूत आनंद सोनवणे ,मोहन चौधरी ,दत्ता नेरकर, आकाश बंडे सागर जाधव, जयवंत साबळे प्रवीण कुंभार , दोस्ती यारी ग्रुप फाउंडेशन यांनी परिश्रम घेतले