अमरावती :- आंध्र प्रदेशात गोदावरी नदीमध्ये मंगळवारी रात्री जहाज उलटल्याने दुर्घटना घडली आहे. या जहाजात 40 जण होते, त्यात आतापर्यंत १७ जणांना वाचविण्यात यश आले असून २३ जण बेपत्ता झाले आहे. ही जहाज कोंडमोदलू येथून राजामेंद्रवरमकडे जात होती.
या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री नायडू यांनी बचाव कार्य वेगाने करण्यासोबत पीडित कुटुंबांना योग्य मदत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत. जहाजेत अधिक लोक असल्यामुळे ही दुर्घटना घडली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वास्तविक अधिकाऱ्यांनी म्हटल्यानुसार, खराब हवामान आणि वेगवान वाऱ्यामुळे नाव उलटली असण्याची शक्यता दर्शवली आहे. यामध्ये 10 जणांनी पोहून स्वतःचा जीव वाचविण्यात यशस्वी ठरले. तर इतर 7 जणांना स्थानिक लोकांनी बाहेर काढले असून इतरांचा शोध घेणे सुरु आहे.