आंध्र प्रदेशात गोदावरी नदीत बोट उलटली; १२ जणांचा मृत्यू !

0

अमरावती: आंध्र प्रदेशात गोदीवरी नदीत बोट उलटल्याने झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान यात आतापर्यंत 10 जणांना वाचवण्यात आले आहे. या बोटीतून 61 जण प्रवास करत होते. सध्या एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या असून मदतकार्य सुरू आहे.