शहादा : तालुक्यातील म्हसावद गावात कापसाचे बोगस बियाणे विक्री करणाऱ्या अनधिकृत विक्रेत्याकडे नंदुरबार जिल्हा गुणनियंञक यांनी धाड टाकली. या धाडीत सुमारे एक लाख ७२ हजार रूपये किंमतीचे १० वाणांचे कापसाचे बोगस बियाणे मिळून आले. याबाबत म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदीस सुरुवात होणार असून त्यापूर्वी ही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.