रजनीकांत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात भरती

0

नवी दिल्ली: बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते रजनीकांत यांच्या प्रकृतीत बिघाड झाले असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयानेच प्रसिद्धीपत्रक काढून ही माहिती दिली आहे. रजनीकांत यांना रक्तदाबाचा त्रास झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांचा आगामी ‘अन्नाथे’ या चित्रपटाच्या शुटींगच्या ठिकाणी आठ जणांना करोनाची लागण झाली. त्यानंतर रजनीकांत यांचीही करोना चाचणी करण्यात आली पण ती निगेटिव्ह आली आहे.