तात्काळ सुनावणी करण्याबाबतची पहलाज निहलानी यांची याचिका कोर्टाने फेटाळली

0

मुंबई- सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी याचा ‘रंगीला राजा’ या चित्रपटात सेन्सॉरने २० कट्स सुचविले आहे. यावरून संतप्त झालेल्या पहलाज निहलानी यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्यावर नाराजी व्यक्त करत कोर्टात धाव घेतली. कोर्टाने याबाबत तात्काळ सुनावणी करावी अशी मागणी पहलाज निहलानी यांनी केली होती. परंतु निहलानी यांची ही मागणी कोर्टाने फेटाळून लावली आहे. याविषयी तत्काळ सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला.