पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचा जवान शहीद 

0
जम्मू-काश्मीर :– जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्ताने केलेल्या या गोळीबारात बीएसएफचा जवान देवेंद्र कुमार शहीद झाले आहेत. पाकिस्तानकडून मंगळवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.  एएनआयने याबाबत ट्विट केले आहे.
गेल्या काही दिवसांत सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीची उल्लंघन केले जात आहे. यामध्ये भारताचे अनेक जवान शहीद झाले आहेत. तसेच सीमाभागात राहणाऱ्या नागरिकांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत.