बोरखेडा हत्याकांड : तीन जणांची साक्षी !

भुसावळ प्रतिनिधी l

येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात मा.सरकारी अभियोक्ता श्री.उज्वलजी निकम ययांच्याव्दारे तीन जणांची साक्षी घेण्यात आल्याने बोरखेडा हत्याकांड प्रकरणाला एक वेगळेच वळण येण्याची शक्यता आहे.

रावेर तालुक्यातील बोरखेडा गावी मध्यरात्री एका माथेफिरू तरुणाने चार लहान बालकांची हत्या केली होती.हत्येचे कारण असे होते की,आरोपी हा मयत मुलाचा मित्र होता. आणि त्यांच्या बहिणी वरती लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न करीत असतांना दुसऱ्या बहीण भावाला जाग आल्यामुळे ही गोष्ट उघडीस न येऊ दिल्यामुळे त्याने चौघे बहीण – भावांचा कुऱ्हाडीने निर्घृण खून केला होता.या खटल्यात आरोपी विरुद्ध आरोप न्यायालयाने स्टँड केलेला आहे.या खटल्याची सुनावणी नियमितपणे भुसावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात (ता.२९) रोजी तीन साक्षीदारांची साक्ष झाली यामध्ये घटनास्थळी हे बोरखेडा रस्त्या लगत आहे.पूर्व – पश्चिम बऱ्हाणपूर अंकलेश्वर मार्गावरील दक्षिणेला साधारणतः १५०० मीटर अंतरावर ही घटना घडली आहे.बोरखेडा गावांची वस्ती ३०-३५ घरांची आहे.ते घटनास्थळ आहे ते शेतात आहे.आजू- बाजूला कुठलीही वस्ती नाही.तेथे दोन खोल्याचे घर आहे.त्याला एक खिडकी आहे ती कायम सुरू राहते अशी साक्ष साक्षीदारांने दिली.

सदरील गुन्ह्यातील फिर्यादी मुस्तफा शेख यासिन शहा म्हणाले की,मेताब भिलाला पावरा गेल्या आठ ते दहा वर्षांपासून फिर्यादी कडे शेतात बोरखेडा शिवारात मजूर म्हणून कामाला आहे.तसेच त्यांच्या सोबत परिवार आहे.(ता.१५ ऑक्टबर २०२० रोजी सकाळी आठ वाजेला शेतात गेलो असता.सोबत त्यांची पत्नी,मुलगा यांच्यासह मध्यप्रदेशात नातेवाईकांसोबत दशक्रियेला गेलेले होते. त्यावेळी सविता ही १३ वर्षांची,राहुल ११ वर्षांचा,अनिल ८ वर्षांचा, सुमन ६ वर्ष असे लहान मुले होते. (ता.१६/१०/२०२०) रोजी सकाळी नेहमी प्रमाणे सकाळी आठ वाजेला शेतात जात असतांना घराचा दरवाजा बंद दिसला.असे उठता की,नाही.कुठे गेले आहे असे कोणी दरवाजा उघडला नाही.त्यावेळी फिर्यादीने दरवाजा उघडला लोटला तर आत मध्ये चार प्रेत पडलेली होती.मयत मुलीच्या गळ्यावर, मानेवर कुऱ्हाडी ने वार केलेले होते.कुऱ्हाड ही घटनास्थळी पडून होती.याबाबत पोलिसांना कळविले असता त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला तसेच गुन्हा दाखल करून घटनास्थळावरून १७ वस्तू जप्त केल्या होत्या.

बोरखेडा हत्याकांड प्रकरणातील तीन जणांची साक्ष न्यायालयाचा दरवाजा बंद करून आत मध्ये झाली हे सर्व कामकाज भुसावळ जिल्ह्या न्यायाधीश व तिसरे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे मा.न्यायाधीश आर.एस.जाधव यांच्या कोर्टात तब्बल तीन तास सुरू असल्याची माहिती सरकारी अभियोक्ता उज्वल निकम यांनी दै. जनशक्ती शी बोलतांना दिली.