अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

0

ठाणे: एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विक्की (१९) असे अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव असून मध्यवर्ती पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा १३ वर्षीय अल्पवयीन मुलगा त्याच्या घराजवळ खेळत होता. त्यावेळी त्याच परिसरात राहणारा विक्की याने त्या पीडित अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने आड वाटेला असेलल्या एका दुकानामागे नेऊन त्याच्यावर जबरदस्तीने अनैसर्गिक अत्याचार केला. या घटनेबाबत कोणाला सांगशील तर तुला मारून टाकेन अशी धमकीही पीडित मुलास दिली.

घटनेनंतर पीडित मुलाने अत्याचाराची माहिती कुटुंबियांना दिली आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यानंतर तक्रारीनुसार नराधम विक्की विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.