भुसावळलात लेवा समाजाची मंथन बैठक संपन्न

भुसावळ प्रतिनिधी  l

लेवा समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी युवा फोरम स्थापन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्यानिमित्त विचार विनिमय करण्याकरिता आज भुसावळ शहरातील हितवर्धक येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.

रविवार दिनांक २५ जून रोजी भुसावळ शहरातील रामानंद हॉल जळगाव रोड भुसावळ येथे सकाळी १० ते दुपारी ३ वाजता भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी लेवा पाटील समाजातील सर्व बंधू व भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मीटिंगमध्ये समाजातील विविध विषयावर चर्चा करण्यात आली. समाज संघटित करणे व समाज प्रबोधन करणे. पावागड पासून एकता ज्योत घेऊन समाज बांधव असलेल्या गावागावात नेणे व शेवटी समारोप ठिकाणी महामेळाव्याचे नियोजन करणे, समाजात बेरोजगारी वाढली यावर मार्ग काढणे, शेतकरी बांधवांचे प्रश्नावर गांभिर्याने विचार विनिमय करणे. शेतकरी बांधवांची लूट व्यापारी वर्गाकडून होत आहे त्याला आळा बसविणे व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे. युवा फोरम तयार करणे, समाजात अलीकडे घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढलेले आहे ते कमी कसे करता येईल. लग्न वेळेवर न लागणे. लग्नात अवास्तव खर्च प्री वेडिंग तसेच डीजेचा सर्रास वापर बंद करणे. शिक्षित समाज असून सुद्धा सामाजिक आर्थिक व राजकीय दृष्ट्या समाज मागे जात आहे. याबद्दल विचारविनिमय युवक युवतींना इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मार्गदर्शन कसे उपलब्ध होईल यावर विचार पुढील नियोजन व कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या समित्या करणे व जबाबदारी वाटप करणे. प्रत्येक भागातील व्यक्तींना प्रतिनिधित्व देणे. दर

महिन्याला आढावा बैठकीचे नियोजन करणे. आदी विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी माजी आमदार निळकंठ पालक निलेश महाजन अजय पाटील शिशिर जावळे प्रदीप पाटील यांच्यासह समाजातील बांधव उपस्थित होते..