उपहार चविष्ट नव्हता म्हणून मोडले लग्न

0

कानपूर- उत्तर प्रदेशातील कानपूर येथे उपहार चांगला नव्हता म्हणून चक्क लग्न मोडल्याची घटना घडली आहे. नवरा मुलाच्या वाहिनीला उपहारात डोसा खायला देण्यात आला. नास्ता बरोबर नव्हता म्हणून नवरदेवाच्या वाहिनेने हा उपहार नवरी मुलीच्या काकाच्या तोंडावर फेकले. ही बाब नवरी मुलीच्या वडिलाच्या व भावाच्या लक्षात आल्यानंतर लग्नात गोंधळ झाला. ही बाब नवरी मुलीला कळल्यानंतर तिने चक्क लग्नास नकार दिला. माझ्यासाठी माझ्या वडिलांची अब्रू मोठी असून ज्या घरात माणसाला किंमत नाही अशा घरात मी नांदणार नाही असे म्हणत खुद्द नवरी मुलीने लग्न करण्यास नकार दिला. कानपूर जिल्ह्यातील मंगलपूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कौरु गावातील ही घटना आहे. किरकोळ गोष्टीमुळे हाणामारी देखील झाली.