जळगाव: कोरोनाचे जगभर फैलाव झाले आहे. भारतात 21 दिवसांचे लॉकडाऊन घोषित करण्यातआले आहे. दरम्यान आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात एकही संशयित रुग्ण नव्हते, मात्र आज शनिवारी सायंकाळी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णाला काल शुक्रवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्याचा आज सायंकाळी रिपोर्ट आला अशी माहिती डीन डॉ.भास्कर खैरे यांनी दिली.