BREAKING: मंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न !

0

मुंबई: विनानुदानित अपंग शाळांना अनुदान मिळावे या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करून देखील अनुदान मिळत नसल्याने आज बुधवारी मंत्रालयात अपंग शिक्षकांनी मंत्रालयात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सुदैवाने मंत्रालयात जाळी बसविण्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या शिक्षकाला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.