जयपूर: कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंड केल्याने राजस्थानमधील कॉंग्रेस सरकार अडचणीत आले होते. मात्र आता सचिन पायलट परत कॉंग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. सचिन पायलट परतल्याने सरकारवरील धोका टळला आहे. मात्र तरीही मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पुढील सहा महिन्यांसाठी निश्चित राहण्याच्या दृष्टीने विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय घेतला. आज शुक्रवारी १४ रोजी विधानसभेचे सत्र बोलविण्यात आले असून कॉंग्रेसने सभागृहात विश्वास मतासाठी प्रस्ताव दाखल केला आहे. मात्र पावसामुळे वेळेत आमदार विधानसभेत दाखल होऊ शकले नसल्याने सत्र दुपारी १ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
Jaipur: Former Rajasthan CM & BJP leader Vasundhra Raje and Congress leader Sachin Pilot arrive at #Rajasthan Assembly. pic.twitter.com/R2bFHMSKZP
— ANI (@ANI) August 14, 2020
कॉंग्रेसचे गेहलोत आणि पायलट गटाचे आमदार वेगवेगळे विधानसभेत दाखल झाले. या सत्तासंघर्षात कॉंग्रेसचे सर्व आमदार हॉटेलमध्ये थांबून होते. ते सगळे आमदार आता विधानभवनात दाखल होत आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, भाजप नेत्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया विधानभवनात दाखल झाले आहेत.