BREAKING: अखेर शरद पवारांनी सांगितले अजित पवारांच्या बंडाचे कारण !

0

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठींबा देत एकच खळबळ उडवून दिली होती. अजित पवारांच्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र दोन दिवसातच अजित पवारांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा दिला. अजित पवार यांनी हा निर्णय का? घेतला हा संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला प्रश्न पडला होता. या प्रश्नाचे अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. कॉंग्रेससोबत नेहरू सेंटरमध्ये बैठक सुरु असताना कॉंग्रेस आणि आमच्यात मतभेद झाले. तीव्र मतभेद झाले. यावरूनच अजित पवार नाराज झाले. हे आजच इतक्या टोकाचे विरोध करत असतील तर भविष्यात यांच्यासोबत राहणे अवघड होईल असे सांगून वेगळा निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांना पाठींबा दिला असे शरद पवार यांनी सांगितले.

एबीपी माझा या वृत्त वाहिनीला त्यांनी मुलाखत दिली, यावेळी त्यांनी सरकार स्थापनेमागील सर्व गोष्टींचा उलगडा केला. अजित पवार यांनी निर्णय घेण्यापूर्वी मला कल्पना दिली होती, मात्र त्याला मी थांबण्याचे सांगितले होते. परंतु त्याने तो निर्णय घेतला. भाजपसोबत जाण्यास मी अनुकूल नव्हतो, त्यामुळेच अजित पवार यांनी नंतर राजीनामा देऊन परत पक्षासोबत आले असेही शरद पवार यांनी सांगितले.