BREAKING: अजित पवारांचा राजीनामा नाट्य सुरु असताना संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला !

0

मुंबई: काल राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. कालपासून अज्ञातवासात असलेले अजित पवार आज माध्यमासमोर आले थोड्याच वेळात ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.

दरम्यान आताची सर्वात मोठी घडामोडी म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवास्थानी दाखल झाले आहे. त्यामुळे राजकारणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे. एकीकडे शिवसेना-भाजप युतीचा निर्णय बाकी असताना संजय राऊत हे शरद पवारांच्या भेटीला गेल्याने राजकारणात उलट-सुलट चर्चा सुरु आहे.