BREAKING: अजित पवारांनी दिलेले सर्व कागदपत्रे उद्या सादर करा; कोर्टाचे आदेश

0

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठींबा दिल्याने मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या राजकीय घटनेनंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. मात्र याविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस नेते सुप्रीम कोर्टात गेले आहे. यावर आज रविवारी २४ रोजी तातडीने सुनावणी घेण्यात आली. शिवसेनेतर्फे कपिल सिब्बल, राष्ट्रवादीकडून अभिषेख मनू सिंघवी तर सरकारकडून सॉलीसीटर जनरल तुषार मेहता, मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. युक्तिवाद पूर्ण झाला असून राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी केलेल्या प्रक्रियेची कागदपत्रे उद्या १०.३० वाजेपर्यंत सुप्रीम कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले आहे. तुषार मेहता यांना उद्या कागदपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यावर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. तसेच आज झालेल्या सुनावणीचा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भाजपला काहीसा दिलासा मिळाला आहे.

कोर्टाने केंद्र सरकार, राज्य सरकार, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना नोटीस जाहीर केली आहे.

युक्तिवाद सुरु झाल्यानंतर शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी भाजपने सभागृहात तातडीने बहुमत सिद्ध करावे अशी मागणी केली, आजच तातडीने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी सिब्बल यांनी कोर्टात केली. पहाटे शपथविधी होणे, राष्ट्रपती राजवट हटविण्याची शिफारस कधी झाली याबाबतची माहिती देण्याची मागणी कपिल सिब्बल यांनी केले आहे. भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.