BREAKING: अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री; राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब !

0

मुंबई: बंड करून अजित पवार भाजपसोबत उपमुख्यमंत्री झाले होते. मात्र दोन दिवसातच त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पाडले. राष्ट्रवादीत पुन्हा ते परतले आणि त्यांनी राष्ट्रवादीत सक्रीय सहभाग घेतला. मात्र ते राष्ट्रवादीकडून पुन्हा अजित पवार उपमुख्यमंत्री होणार का? याबाबत चर्चा होती. अखेर अजित पवार हेच उपमुख्यमंत्री पदी विराजमान होणार आहे. आठवड्याभरात दुसऱ्यांदा ते उपमुख्यमंत्री होणार आहे. बंडानंतर पुन्हा त्यांना बक्षीस मिळाले आहे. राष्ट्रवादीकडून त्यांची मनधरणी सुरु होती. त्याला यश आले ते पुन्हा पक्षात परतले होते. मात्र ते राजकारणात सक्रीय राहतील का याबाबत चर्चा होती.

राष्ट्रवादीत परत आल्यानंतर अजित पवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार की नाही याबाबत चर्चा होती. त्यामुळे राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांचे नाव उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे होते. अखेर अजित पवार यांच्या नावापुढे शिक्कामोर्तब झाले आहे.