नवी दिल्ली: भारतात कोरोनाचा कहर सुरु आहे. राजकीय नेतेही आता कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. धक्कादायक म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीटकरून याची माहिती दिली आहे. त्यांना कोरोनाचे लक्षणे जाणवू लागल्याने तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते पुढील उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल झाले आहे. गुरूग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी संपर्कात आलेल्यांना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
देशभरात त्यांच्या प्रकृतीविषयी प्रार्थना केली जात आहे. ते यातून लवकर बरे व्हावेत यासाठी साकडे घातले जात आहे.
कोरोना के शुरूआती लक्षण दिखने पर मैंने टेस्ट करवाया और रिपोर्ट पॉजिटिव आई है। मेरी तबीयत ठीक है परन्तु डॉक्टर्स की सलाह पर अस्पताल में भर्ती हो रहा हूँ। मेरा अनुरोध है कि आप में से जो भी लोग गत कुछ दिनों में मेरे संपर्क में आयें हैं, कृपया स्वयं को आइसोलेट कर अपनी जाँच करवाएं।
— Amit Shah (@AmitShah) August 2, 2020
()