BREAKING: आता नोव्हेंबरपर्यंत गरीबांना मोफत धान्य: मोदींची घोषणा

0

नवी दिल्ली: कोरोनामुळे देशातील जनता आर्थिक संकटात सापडली आहे. जनतेला आधार देण्यासाठी केंद्र सरकारने गरीब कल्याण योजनेअंतर्गत देशातील 80 कोटी जनतेला दरमहिन्याला मोफत धान्य देण्याची योजना सुरू केली होती. या योजनेच्या कालावधीत आता वाढ करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. 30 नोव्हेंबरपर्यंत प्रति सदस्य 5 किलो गहू किंवा तांदूळ मोफत देण्यात येईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आज त्यांनी देशातील जनतेशी संवाद साधला, यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

एवढेच नाही तर संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनाही लवकरच लागू केली जाणार आहे अशीही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. कोरोनाच्या संकटात देशातील जनतेला अनेक आर्थिक लाभ दिले गेले त्याचे श्रेय फक्त शेतकरी आणि करदात्यांना दिले जाईल असे सांगत मोदींनी करदात्यांचे आभार मानले.