कॅगचा अहवाल विधानसभेत सादर; फडणवीस सरकारवर ठपका

0

मुंबई: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी कॅगचा अहवाल विधानसभेत सादर केलेला आहे. फडणवीस सरकारच्या काळात मुंबई विमानतळ आणि मेट्रो प्रकल्पाच्या कामात घोटाळा झाल्याचे आरोप करण्यात आले आहे. मागील सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यावर कॅगच्या अहवालात ताशेरे ओढण्यात आल्याने सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न आहे. ३१ मार्च २०१८ ला संपलेला आर्थिक वर्षाचा हा अहवाल आहे.

राज्यपाल यांनी या अहवालावर स्वाक्षरी केल्याने तो आज विधानसभेत सादर करण्यात आला आहे. भाजपच्या काळात अनियमितता आढळल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता विरोधकांची कोंडी होण्याची शक्यता आहे.