BREAKING: उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला !

0

मुंबई: राज्यात भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून बिनसले असल्याने भाजपने सत्ता स्थापन करण्यास नकार दिला आहे. आता शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या पाठींब्यावर सरकार बनविणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत ठोस निर्णय जाहीर केलेला नाही. आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेला राज्यपालांकडे निर्णय जाहीर करावा लागणार आहे. दरम्यान आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शरद पवार यांना भेटण्यासाठी पवारांच्या निवासस्थानी गेले आहे. या भेटीत सरकार स्थापनेबाबत चर्चा होणार आहे. राष्ट्रवादी, कॉंग्रेसला द्यावयाचे मंत्रीपदावर देखील यावेळी निर्णय होईल. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील आहेत.

कॉंग्रेस शिवसेनेला पाठींबा देणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी माध्यमांशी संवाद साधताना, महाराष्ट्रातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेते शिवसेनेला पाठींबा देऊन सरकारमध्ये सहभागी होण्यास यापूर्वी देखील अनुकूल असल्याने आता शिवसेनेला पाठींबा देणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दुपारी ४ वाजता कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील नेते आणि पक्षश्रेष्ठीची बैठक होणार आहे, त्यानंतर अधिकृत निर्णय होणार आहे.