BREAKING: एकनाथराव खडसे दुसऱ्यांदा पंकजा मुंडे यांच्या भेटीला !

0

मुंबई: भाजपमध्ये सध्या नाराजीनाट्य सुरु आहे. ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे, पंकजा मुंडे हे सध्या भाजपमध्ये नाराज असल्याचे बोलले जात आहे. कालच खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. तत्पूर्वी आज एकनाथराव खडसे पंकजा मुंडे यांच्या भेटीला गेले आहे. पंकजा मुंडे ह्या देखील भाजपावर नाराज असून त्या पक्ष सोडणार असल्याचे बोलले जात आहे. खडसे हे देखील भाजप सोडणार असल्याची चर्चा आहे. त्यातच खडसे यांनी आठवड्यात दुसऱ्यांदा पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.

काल सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची खडसे यांनी दिल्लीला भेट घेतली होती. खडसे यांनी शरद पवारांसोबत अर्धा तास चर्चा केली.

खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्यावर अन्याय होत राहिला तर वेगळा विचार करावे लागेल असा भाजपला इशारा दिला होता. त्यानंतर त्यांनी शरद पवार आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याने ते पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेला वेग आले आहे.

दरम्यान कॅबिनेट मंत्री कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी खडसे कॉंग्रेसमध्ये आले तर कॉंग्रेसला बळकटी मिळेल असे सांगितले. खडसे यांच्या अहवेलनामुळे जनतेमध्ये नाराजी असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.