BREAKING: कॉंग्रेसच्या गटनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड !

0

मुंबई: राज्याच्या राजकारणाला आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे वेग आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्या तातडीने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. दरम्यान कॉंग्रेसने अद्याप पक्षाचा विधिमंडळ गटनेत्याची निवड केलेली नव्हती. आज मंगळवारी कॉंग्रेसने विधिमंडळ गटनेत्याची निवड केली आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तशी घोषणा करण्यात आली आहे. कॉंग्रेसचे केंद्रातील नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली.

हॉटेल जे.डब्ल्यू, मरिएड येथे कॉंग्रेस नेत्यांची बैठक झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या वेळी गटनेत्याचा व्हीप महत्त्वाचा मानला जाणार आहे. त्यासाठी गटनेत्याकडे विशेष लक्ष लागले आहे.