BREAKING: खडसे, काकडेंना डावलून भाजपची तिसऱ्यालाच राज्यसभेची उमेदवारी

0

मुंबई: राज्यसभेसाठी निवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झाली आहे. भाजपकडून माजी खासदार उदयनराजे भोंसले, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तिसरा उमेदवार कोण असणार? याबाबत चर्चा होती. माजी मंत्री एकनाथराव खडसे, संजय काकडे यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळणार असे बोलले जात होते. मात्र भाजपने मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे खडसे आणि संजय काकडे यांच्या नावाला पूर्णविराम मिळाले आहे. भागवत कराड हे औरंगाबादचे माजी महापौर राहिले आहे.

राज्यसभेसाठी भाजपमध्ये अनेक इच्छुक होते. कॉंग्रेसमधून भाजपात दाखल झालेले ज्योतिरादित्य सिंधिया यांना काल उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय आसाममधून भुवनेश्वर कालीता, बिहारमधून विवेक ठाकूर, गुजरातमधून अभय भारद्वाज, झारखंडमधून दीपक प्रकाश, राजस्थानमधून राजेंद्र गेहलोत आणि मणिपूरमध्ये लिएसिम्बा महाराजा यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीकडून शरद पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.