मुक्ताईनगर: भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना यंदाच्या विधानसभेसाठी अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे काही तासच शिल्लक राहिले आहे. दरम्यान खडसेंवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत समर्थकांनी खडसे यांनी योग्य निर्णय घेण्याची विनंती केली आहे. दरम्यान आज गुरुवारी खडसे यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते, समर्थक यांचा मेळावा सुरु आहे. दरम्यान मेळावा सुरु असताना भाजपच्या एका कार्यकर्त्याने आत्म्हत्येचा प्रयत्न केला आहे.
रावेर येथील भाजप कार्यालयासमोर नानाभाऊ महाजन नामक एका समर्थकाने स्वत:वर रॉकेल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. खडसे यांना ही माहिती मिळताच त्यांनी समर्थक नानाभाऊ महाजन यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. पक्ष बदनाम होईल असे कोणतीही कृती करू नका असे आवाहन खडसे यांनी समर्थकांना केले आहे.
पक्षाने मला उमेदवारी न देता तुम्ही सांगाल त्याला उमेदवारी देण्यात येईल असे सांगितले असल्याचे खडसे यांनी यावेळी सांगितले. मात्र मला का उमेदवारी नाही याबाबत स्पष्टीकरण पक्षाने करावे असेही खडसे यांनी मागणी केली आहे.