Breaking : जळगाव जिल्ह्यात आणखी पाच कोरोना बाधित रूग्ण आढळले

0

जळगाव – नुकत्याच प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालानुसार जिल्ह्यातील संशयित रुग्णांपैकी 56 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे.
यापैकी 51 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर पाच व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत.

जळगावच्या दोघा कोरोनाबाधीतांमध्ये एक जोशीपेठ तर एक चोपडा तालुक्यातील अडावद येथील आहे. तर पाचोरा येथील कोरोनाबाधीत हा भीमनगरातील आहे. त्याचा मृत्यू झालेला आहे. तर भुस‍ावळातील १५ वर्षीय मुलगा हा शांतीनगरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 37 झाली आहे. यापैकी दहा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एक रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे.

आता प्राप्त झालेल्या निगेटिव्ह अहवालातील 51 व्यक्तींपैकी 16 व्यक्ती या अमळनेरच्या, 6 व्यक्ती पाचोरा, 4 व्यक्ती भुसावळच्या तर उर्वरित जळगावच्या आहेत. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे.