BREAKING: जळगाव जिल्ह्यात सर्वच मतदारसंघात ईव्हीएम बिघडले !

0

१४ ईव्हीएम, १४ कंट्रोल युनिट आणि तब्बल ६४ व्हीव्ही पॅटमशीनमध्ये बिघाड

जळगाव: आज राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाले आहे. मतदान सुरु झाल्यानंतर काही तासातच मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे प्रकार घडले. जळगाव जिल्ह्यात जवळपास सर्वच मतदारसंघात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचे दिसून आले आहे. यात १४ ईव्हीएम, १४ कंट्रोल युनिट आणि तब्बल ६४ व्हीव्ही पॅटमशीनमध्ये बिघाड झाल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दैनिक जनशक्तीशी बोलताना दिली.

या मशीनमध्ये झालेल्या बिघाडामुळे काही ठिकाणी १५ ते ३० मिनिटे मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. या संदर्भात नागरिकांनी क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर मशीन त्वरित बदलविण्यात आल्या. त्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरु झाली. मॉकड्रील करून देखील मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने विरोधकांकडून संशय व्यक्त होत आहे. याबाबत कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रात बिघाड झाल्याचे समोर आले आहे.