BREAKING: जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक जाहीर !

0

पंचायत समिती सभापती निवडीचाही कार्यक्रम जाहीर

जळगाव: जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाल संपला चार महिन्यापूर्वीच संपलेला आहे. मात्र विधानसभा निवडणुकीमुळे हा कार्यकाळ वाढविण्यात आला होता. दरम्यान आता नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नव्या वर्षात 3 जानेवारीला नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड होणार आहे तर 6 जानेवारीला विषय समिती सभापतींची निवड होणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती निवडीसोबतच जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड 2 जानेवारीला होणार आहे. यापूर्वी २२ डिसेंबरला अध्यक्ष, उपाध्यक्ष तर २६ डिसेंबरला विषय समिती सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र तो रद्द करण्यात आला. आता नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिलेचे आरक्षण निघाले आहे.

राजकीय हालचालींना वेग
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकिय हालचालींना गती येणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याचे अध्यक्ष निवडीकडे लक्ष लागले होते. अध्यक्षपद सर्वसाधारण महिला राखीव निघाले असून, सलग तिसऱ्यांदा महिलाराज येणार आहे. महिला राखीव असे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या अनेकांना थांबा लागला होता, तो आता पुन्हा सुरू होणार आहे. मुदत संपल्यानंतर आणखी दोन महिने मुदतवाढ मिळणार मिळणार अशीच चर्चा रंगत होती. परंतु अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी तारीख जाहीर करण्यात आली असून, ही निवड प्रक्रिया 3 जानेवारीला होणार आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आदेश पारीत करण्यात आला.

कार्यक्रम पुढील प्रमाणे
अध्यक्षपदाची निवड 3 जानेवारीला सकाळी अकराला जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात उपजिल्हाधिकारी (महसूल) रवींद्र भारदे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. सकाळी 11 ते 1 दरम्यान अर्ज भरणे, यानंतर अर्जांची छानणी होवून 2 वाजेपर्यंत माघारीची वेळ आहे. यानंतर अध्यक्ष निवड केली जाणार आहे. तसेच पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापतींची निवड संबंधित तालुक्‍यांच्या पंचायत समिती कार्यालयात 2 जानेवारीला सकाळी अकराला होईल. तर विषय समित्यांच्या सभापतींची निवड नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली 6 जानेवारीला होणार आहे.