मुंबई: आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठींबा दिल्याने मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. सोबतच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या राजकीय घटनेनंतर संपूर्ण देशात एकच चर्चा सुरु आहे. अजित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे हे देखील होते असे सकाळपासून बोलले जात होते. धनंजय मुंडे कालपासून नॉट रिचेबल होते, त्यामुळे त्यांच्यावर संशय बळावला होता. मात्र आता धनंजय मुंडे देखील राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी वाय.बी.चव्हाण सेंटरला पोहोचले आहे. यावेळी धनंजय मुंडे यांनी मी बैठकीतून बाहेर आल्यानंतर बोलतो असे सांगून पुढे गेले. वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक होत आहे, त्यासाठी सर्व आमदार एकत्र आले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील सकाळी धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क झाला असल्याचे सांगून ते सुद्धा परत येतील असे सांगितले होते.
दरम्यान अजित पवारांनी घेतलेल्या या निर्णयाची कल्पना खुद्द शरद पवारांना नव्हती. त्यामुळे त्यांनी अजित पवारांचा निर्णय हा स्वत:चा निर्णय आहे, पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगत, सर्व आमदार पक्षासोबत असल्याचे सांगितले होते. दरम्यान आता राष्ट्रवादीचे अजित पवारांसोबत गेलेले आमदार परत पक्षात आले आहे. स्वत: आमदारांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. ११ पैकी ७ आमदार परत आले आहे.