BREAKING: पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार; उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार

0

मुंबई: विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अद्याप शिवसेना-भाजप युतीचा निर्णय झालेला नाही. दरम्यान दोन दिवसात युतीची घोषणा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पुढील मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. मुंबईत शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा सुरु आहे, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्याभरतील प्रमुख आणि कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित आहे.

युतीबाबत चर्चा झाली असून युती होणार आहे, अधिकृत घोषणा एकदोन दिवसात होईल असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

मागील आठवड्यात भाजप नेते अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यावेळी अमित शहा यांनी पुढील मुख्यमंत्री भाजपचा होणार असून देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील असा दावा केला होता. त्यामुळेच शिवसेना प्रमुख यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे.