BREAKING: फडणवीस यांना कोर्टाचा दिलासा; जामीन मंजूर !

0

नागपूर: २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरील गुन्हाची माहिती लपविल्याचे आरोप आहे. या प्रकरणी कोर्टाने फडणवीस यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. दरम्यान आज गुरुवारी देवेंद्र फडणवीस स्वत:हून नागपूर कनिष्ठ न्यायालयात हजर झाले. या प्रकरणी आता फडणवीस यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने फडणवीस यांना जामीन मंजूर केला आहे. दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून सन २०१४ ची विधानसभा निवडणूक लढवताना उमेदवारी अर्जासोबत केलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रलंबित फौजदारी खटल्यांची पूर्ण माहिती न दिल्याबद्दल लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम १२५ ए अन्वये खटला चालवण्याच्या गेल्या वर्षी दिलेल्या निकालाचा फेरविचार करावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी निकाल राखून ठेवला होता.