मुंबई: काल शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या पाठिंब्यावर शपथ घेतली. सोबतच उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली. मात्र अजित पवारांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचे उघड झाले आहे. सर्व आमदार राष्ट्रवादीतच आहेत. त्यांच्याकडील गटनेते पद देखील काढून घेण्यात आले आहे. कालपासून अजित पवार कोणाशीही संपर्कात नाही. आज अजित पवारांनी प्रथमच ट्वीटकरून आपले मत व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारांनी ट्वीट केले आहे. राष्ट्रवादीकडून अजित पवारांची मनधरणी सुरु होती, मात्र त्यात यश आलेले नसताना आता अजित पवारांनी भाजप नेत्यांचे आभार मानल्याने राजकारणाला नवीन कलाटणी मिळणार आहे.
अजित पवार यांनी ट्वीटरवरील प्रोफाईल देखील बदलले आहे. यात त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला आहे आणि राष्ट्रवादीचे नेते म्हणून देखील अजित पवार यांनी उल्लेख केला आहे.
ट्वीटमध्ये अजित पवार यांनी भाजप नेत्यांचे आभार मानले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे.पी.नड्डा, नितीन गडकरी, पियुष गोयल, राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन यांना ट्वीटकरून आभार मानले आहे. कालपासून अजित पवार यांचे अधिकृत भाष्य किंवा वक्तव्य आले नव्हते. त्यानंतर आज पहिल्यांदाच त्यांनी ट्वीट करून आभार मानले आहे.
काल अजित पवार यांनी मी माझ्या सोयीनुसार माझी भूमिका स्पष्ट करेल असे अजित पवारांनी सांगितले होते.