BREAKING: भाजप विरोधात बसण्याच्या तयारीत?

0

मुंबई: मुंबई: राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अधिकच वाढला आहे. राज्यपालांनी भाजपला मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. मात्र बहुमत नसल्याने भाजपकडून सत्ता स्थापनेला विलंब होत आहे. दरम्यान यावर चर्चा करण्यासाठी आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. बैठकीत जर शिवसेना सत्ता स्थापन करणार असेल तर भाजप विरोधात बसण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

भाजप नेत्यांनी अमित शहांशी चर्चा केली. अमित शहांनी शिवसेना जर सरकार बनविणार असेल तर भाजपने विरोधात बसावे असे सांगितल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप नेत्यांची कोअर कमिटीची बैठक आज सुरु आहे. पहिली बैठक संपली असून दुसरी बैठक ४ वाजता होणार असून त्यानंतर जो निर्णय होईल तो माध्यमांना सांगितले जाणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख यांनी आमदारांची रिट्रीट या हॉटेलमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असे पुनरुच्चार करत आमदारांशी चर्चा केली. तसेच त्यांनी अजूनही वेळ गेलेली नसल्याचे सांगत भाजपला चर्चेचे संकेत दिले आहे.