परळी: ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे ह्या प्रचारादरम्यान चक्कर येऊन व्यासपीठावर कोसळल्या. परळीतील प्रचारसभेत भावनिक भाषण केल्यानंतर मुंडे व्यासपीठावर कोसळल्या. यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परळी विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे यांच्या विरोधात त्यांचेच बंधू विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे निवडणुकीच्या रिंगणात आहे. अटीतटीची ही लढत होणार आहे. याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान आता त्यांची प्रकृती बरी असून त्या घरीच थांबून आहेत.