मुंबई: आज देवेंद्र फडणवीस यांचे ८० तासाचे सरकार कोसळले. अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने सरकार अल्पमतात आल्याच्या लक्षात आल्याने मुख्यमंत्री पदाचा देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा दिला. आता नवीन सरकार महाविकास आघाडी स्थापन करणार आहे. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाने केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा आग्रह ठेवला होता.
या सरकारचा शपथविधी सोहळा १ डिसेंबर रोजी होणार आहे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री १ डिसेंबर रोजी शिवाजी पार्क येथे शपथ घेणार आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत झाले आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे नेतृत्व करणार आहे.